इस्लामाबाद – शेजारी देश पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि निर्बंध असताना झालेल्या निवडणुकांच्या निकालांवर संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. मात्र, मतमोजणीतील विलंबामुळे अजूनही नव्या सरकारचे भवितव्य अधांतरी आहे.
निवडणूक आयोगाने माध्यमांना निकाल पुरवणे बंद केले असून, देशातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात इम्रान खान यांच्या पक्षाला मिळत असलेल्या यशानंतर सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मतमोजणी २४ तासांपूर्वी सुरु होऊनही निकालांबाबत अनिश्चितता आहे.
पाकिस्तानमध्ये बहुमत मिळवण्यासाठी पक्षांना १३४ जागांची गरज आहे. एकूण ५१२१ उमेदवार १६७ नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवत आहेत. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) (पीएमएल-एन) आणि बिलावल भुट्टो आणि आसिफ अली झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी).
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) यांच्यात खरी लढत आहे. इम्रान खान यांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह आयोगाने गोठवले आहे. त्यामुळे पीटीआयचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.
आतापर्यंतच्या निकालांमध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणारे उमेदवार आघाडीवर आहेत. पाकिस्तानी राजकारणातील अनेक बडे चेहरे विजयी झाले आहेत तर काही मोठ्या नावांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
नवाझ शरीफ यांच्या पक्ष पीएमएल-एनचे उमेदवार मरियम नवाझ शरीफ, शाहबाज शरीफ आणि हमजा शरीफ नॅशनल असेंब्लीवर निवडून आले आहेत. दुसरीकडे, बिलावल भुट्टो झरदारी आणि खुर्शीद शाह यांसारख्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या मोठ्या नावांनीही निवडणुकीत विजय मिळवला आहे.
अखेरची बातमी हाती आली तेव्हा, इम्रान खान यांच्या पीटीआय समर्थित उमेदवार २४ जागांवर आघाडीवर आहेत. तर पीएमएल-एन आणि पीपीपी उमेदवार प्रत्येकी १८ जागांवर आघाडीवर आहेत. तुरुंगात डांबलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने शुक्रवारी सार्वत्रिक निवडणुकीत विजयाचा दावा केला आणि निवडणुकीत घोटाळा करण्यासाठी निकालांना उशीर केला जात असल्याचा आरोप केला.
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाने एका निवेदनात पंतप्रधानपदाचे सर्वात मोठे दावेदार मानले जाणारे पीएमएल-एनचे सर्वोच्च नेते नवाझ शरीफ यांना पराभव स्वीकारण्यास सांगितले. पीएमएल-एनने मात्र ही मागणी फेटाळून लावत गुरुवारी होणाऱ्या निवडणुका जिंकल्याचा दावा केला. हेराफेरी, तुरळक हिंसाचार आणि देशव्यापी मोबाइल फोन बंद केल्याच्या आरोपांदरम्यान गुरुवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरही पाकिस्तानमध्ये मतमोजणी सुरू आहे.
एका साधारण अंदाजानुसार इम्रान खान पुनरागमनाच्या मार्गावर असल्याचे दिसून येत असले तरी बहुमताबाबत माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनीही दावे केले आहेत. मतदानातील हेराफेरी, तुरळक हिंसाचार आणि देशव्यापी मोबाइल फोन बंद झाल्याच्या आरोपांनी प्रभावित झालेल्या गुरुवारच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पाकिस्तानमध्ये रात्री उशिरापर्यंत मतांची मोजणी सुरू होती.
कोण विजयी कोण पराभूत ?
1. बिलावल भुट्टो झरदारी – विजयी – पीपीपीचे बिलावल भुट्टो झरदारी यांनी १३१२१७ मतांनी राष्ट्रीय विधानसभेची जागा क्रमांक एनए १५४ जिंकली आहे.
2. नवीज शरीफ – जिंकले – पीएमएल-एनचे नेते आणि पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार नवाझ शरीफ यांनी १७१०२४ मतांनीएनए १३० क्रमांकाची जागा जिंकली आहे.
3. मरियम नवाज शरीफ – विजयी – नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम नवाज शरीफ पीएमएलएनच्या जागा क्रमांक एनए-११९ मधून 83855 जागांनी विजयी झाल्या आहेत.
4. शाहबाज शरीफ – जिंकले – पीएमएल-एनचे नेते शेहबाज शरीफ यांनी ६३९५१ मतांनी विजय मिळवला आहे.
5. फजल उर-रहमान – पराभूत – जेयुआय प्रमुख मौलाना फजल-उर-रहमान खैबर पख्तुनख्वामधील डेरा इस्माइल खान जागेवरून पराभूत झाले आहेत. या जागेवरून पीटीआय समर्थक अली अमीन गंडापूर विजयी झाले.