इस्लामाबाद :- पाकिस्तानमधील महाविद्यालयांमध्ये होळी साजरी केली जाऊ नये, असे फर्मान देशातल्या उच्च शिक्षण आयोगाने काढले आहे.
होळी हा सण हिंदू सण म्हणून ओळखला जातो. पाकिस्तानची इस्लामी देश म्हणून ओळख असताना कॉलेजांमध्ये होळी साजरी करणे म्हणजे इस्लामी देशाची ओळख पुसून टाकल्यासारखे आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये यापुढे होळी साजरी केली जाऊ नये, असे आयोगाने म्हटले आहे.
होळी साजरी केली जाऊ नये, अशा आशयाचे पत्र आयोगाचे संचालक शाइस्ता सोहेल यांनी शिक्षण संस्थांच्या प्रमुकांना पाठवले आहे. मात्र या पत्रामध्ये विद्यापिठांचा स्वतंत्र उल्लेख करण्यात आलेला नाही.
इस्लामाबादेतील कायदा ए आझम विद्यापिठामध्ये 8 मार्च रोजी होळीचे आयोजन केले गेले होते. म्हणून सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली होती आणि विद्यापीठाच्या या होळी आयोजनावर कट्टरवाद्यांकडून टीका केली गेली होती.
होळीच्या दिवशी विद्यापिठांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात होळीचा सण साजरा केला होता. या होळीच्या निमित्ताने मुले-मुली रंगात रंगले असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.