5 सैनिकांसह 13 नागरिकांचा मृत्यू
रावळपिंडी – पाकिस्तानमधील रावळपिंडी भागात लष्कराच्या प्रशिक्षण देणाऱ्या विमानाला अपघात झाला. या अपघातात हवाई दलातील 5 सैनिकांसह व 13 नागरीकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले असल्याची माहिती पाकिस्तान सैन्याच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.दरम्यान, हे विमान नागरी वस्तित कोसळल्याने या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.
विमान अपघात कोणत्या कारणामुळे झाला याचे नेमके कारण पाकिस्तान सेनेने स्पष्ट केले नाही. विमान प्राथमिक स्वरूपात उड्डान केले होते, रावळपिंडी येथील मोरा कालू गावात विमानाचा अचानक अपघात झाला. या अपघातामुळे परीसरात आगीचे भीषण रूप दीसत होते. बचावकार्य दलाच्या माहितीनुसार विमानाचे नियंत्रण हरवल्याने हा अपघात झाल्याचे समजते. परंतु कोणत्याही विभागाकडून हा अपघाताची कारणे स्पष्ट करण्यात आली नाहीत. दुर्घटनाग्रस्त विमान प्रशिक्षणासाठी वापरले जात होते. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने शोधकार्यात अनेक अडथळे निर्माण झाले होते.