पाकिस्तान आणि इंग्लंड ( PAK vs ENG ) यांच्यात ७ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. इंग्लंडने शुक्रवारी मालिकेतील सहाव्या टी-२० सामन्यात पाकिस्तानवर ८ गडी राखून विजय मिळवला होता. त्यामुळे आता ७ सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ सध्या ३-३ अशा बरोबरीत आहेत. सहाव्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने इंग्लंडसमोर १७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार फलंदाज बाबर आझमने ८७ धावांची खेळी खेळली होती. त्याचवेळी इफ्तिखार अहमदने ३१ धावांचे योगदान दिले होते.
प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने हे लक्ष्य १४.३ षटकात पूर्ण करत मोठा विजय मिळवला होता. इंग्लंडकडून फलंदाजी करताना फिलिप सॉल्टने ४१ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ८८ धावांची दमदार खेळी खेळली होती. त्याच्या खेळीच्या बळावर इंग्लंड संघाने पाकिस्तानला या सामन्यात सहज धूळ चारली आणि मालिकेत ३-३ अशी बरोबरी साधली.
सामना संपल्यानंतर ( PAK vs ENG ) पाकिस्तानचे गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना शॉन टेट म्हणाले की, ‘जेव्हा पाकिस्तान संघ वाईट पद्धतीने हरतो तेव्हा ते (पाकिस्तान संघ किंवा व्यवस्थापन) मला पाठवतात.’ हे ऐकल्यानंतर लगेचच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) अधिकाऱ्याने त्यांचा माईक बंद केला. त्याच बरोबर त्या अधिकाऱ्याने टेटला विचारले की, ‘तू ठीक आहेस ना?’ शॉन टेट यांनी हे वाक्य विनोदात्मक विचाराने म्हटले होते. ( PAK vs ENG T20I Pakistan bowling coach Shaun Tait statement, team loses a match, they send it to me )
Pakistan bowling coach Shaun Tait speaks to the media after the sixth T20I#PAKvENG | #UKSePK https://t.co/bS03Yp0WJf
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 30, 2022
हा व्हिडिओ पाकिस्तानच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. मात्र यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. सामन्याबाबत बोलताना शॉन टेटने इंग्लंडच्या फलंदाजीचे कौतुक केले. इंग्लंडने सुरुवातीपासून गोलंदाजांविरुध्द आक्रमक फलंदाजीचा मार्ग निवडला त्यामुळे त्यांना हा जिंकण्यात यश आले, असेही टेट यावेळी बोलताना म्हणाले.