वॉशिंग्टन : जम्मू काश्मिरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने पाकिस्तानी दहशतवादी गट भारतात दहशरवादी हल्ले घडवून आणण्याची शक्यता आहे. यासाठी पाकिस्तान सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहे. अर्थात याला चीनचा पाठींबा असेल असे वाटत नाही, असे मत अमेरिकेचे संरक्षण उपमंत्री रॅंडल श्रीव्हर यांनी व्यक्त केले.
जम्मू आणि काश्मिरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावर चीनची भूमिका काय राहील? या प्रश्माल श्रीव्हर उत्तर देत होते. ते म्हणाले, चीनचा पाकिस्तानला काश्मिर प्रश्नावर असणारा पाठींबा हा मुख्यत: राजनैतिक आणि मत्सद्दी स्वरूपाचा आहे.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चीन पाकिस्तानला पाठींबा देत आहे. संयुक्त राष्ट्रेत काश्मिरचा उपस्थित करावा की नाही यावर झालेल्या चर्चेत चीन त्यासाठी पाठींबा दिला होता. मात्र, त्यापलिकडे जाऊन अधिक सक्रियपणे चीन पाठींबा देण्याची शक्यता मला दिसत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारताला चीनशी उत्तम संबंध प्रस्थापित करायचे आहेत मात्र, चीनची पाकिस्तानशी दीर्घकाळ मैत्री आहे. तसेच त्यांची भारताशी स्पर्धा सुरू आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.