मुंबई – बॉलिवुडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता संजय गुप्ता यांनी जेव्हा गॅगस्टार ‘मुंबई सागा’ची घोषणा केली, तेव्हापासून प्रेक्षकांना या चित्रपटाची कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे ऑफिशल पोस्टर रिलीज करण्यात आले असून, पोस्टरमध्ये चित्रपटाची रिलीज डेट 19 जून 2020 दर्शविण्यात आली होती.
दरम्यान, मुंबई सागा चित्रपटाची अभिनेता इमरान हाशमीचा फर्स्ट लुक समोर आला आहे. यामध्ये इमरान एका पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चित्रपटात इमरान एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार हे नक्कीच.
या चित्रपटात जॉन अब्राहम, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोहित रॉय आणि अमोल गुप्ते प्रमुख भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट 1980-90 च्या दशकातील असून तेव्हा बॉम्बे ही मुंबईत बदलत होती.