ओवैसी हे भाजपचे चाचा जान – राकेश टिकैत

बागपत – भारतीय जनता पक्ष आणि असदुद्दीन ओवैसी यांचे अंतर्गत साटेलोटे आहे. निवडणुकीच्या राजकारणात भाजपचे हेतु तडीला नेण्यासाठी ओवैसी यांचा पद्धतशीर करून घेतला जात आहे. त्यामुळे ओवैसी हे भाजपचे चाचाजान आहेत अशा शब्दात आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आज त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की लोकांना फसवण्यासाठी ओवैसी हे भाजपवर टीका करतात पण त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. यांच्यातील ही चाल आता आपण ओळखली पाहिजे असे नमूद करताना त्यांनी ओवैसींचा उल्लेख भाजपचे चाचा जान केला आहे त्याला मोठीच दाद मिळाली आहे.

मुख्यमंत्री योगी यांनी अलिकडेच मुस्लिमांचा उल्लेख अब्बाजान अशा शब्दाने केला आहे, त्यामुळे त्यांच्यावर सध्या देशभर टीका सुरू आहे. त्याला उत्तर देताना टिकैत यांनी ओवैसींचा उल्लेख चाचाजान असा उल्लेख करीत भाजपची चांगलीच खिल्ली उडवली

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.