सातारा -जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 49 जणांना गुरुवारी दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. तर 524 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अमोद गडीकर यांनी दिली.
घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील वय 18, 27, 20, 17, 36 वर्षीय पुरुष., वाई तालुक्यातील सिध्दनाथवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 26 वर्षीय महिला, परखंदी येथील 37, 11, 76, 39, 14, 11, 36 वर्षीय पुरुष व वय 57, 67 वर्षीय महिला., सातारा तालुक्यातील सातारा शहरातील गुरुवार पेठेतील 63 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 50 वर्षीय महिला,
जिहे येथील 65 वर्षीय महिला, गोडोली येथील 62 वर्षीय महिला., कराड तालुक्यातील चचेगाव येथील 28 वर्षीय पुरुष, तारुख येथील 60 वर्षीय महिला, चरेगाव येथील 32 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 32 वर्षीय महिला, गुढे येथील 64 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 76, 40 वर्षीय महिला व 54 वर्षीय पुरुष, कराड शहरातील जुनी पोलीस वसाहतीतील 33 वर्षीय पुरुष,
आगाशिवनगर येथील 40 वर्षीय पुरुष, किवळ येथील 56 वर्षीय महिला, व 31 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 62 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 58 वर्षीय महिला., जावळी तालुक्यातील सायगाव येथील 22, 34 वर्षीय महिला व 18 वर्षीय युवक., माण तालुक्यातील मार्डी येथील 31 वर्षीय पुरुष.,
पाटण तालुक्यातील कुसरुंड येथील 47 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 47 वर्षीय पुरुष, कसणी येथील 75 वर्षीय पुरुष, अंबवडे येथील 12, 50, 25, 60 वर्षीय महिला, करळे येथील 48 वर्षीय पुरुष, तारळे येथील 25 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, मिरगाव येथील 18 वर्षीय युवती यांचा समावेश आहे.
524 जणांचे नमुने तपासणीला
जिल्ह्यातील 524 जणांचे नमुने गुरुवारी तपासणीसाठी घेतले आहेत. यामध्ये सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 43, कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 70, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 16,
कोरेगाव 25, वाई 59, शिरवळ 66, रायगाव 28, पानमळेवाडी 9, मायणी 49, मायणी 37, महाबळेश्वर 20, पाटण 44, खावली 4 व कृष्णा हॉस्पिटलमधील 103 अशा एकूण 524 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे व कराड येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत.