कोपरगाव (प्रतिनिधी) – शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव कोपरगाव मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असून त्याच धर्तीवर आम्ही आमच्या प्रभागात विकासकामे करत आहोत. प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राजकारण न करता प्रभागातील विकासकामे करणे हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व माजी उपनगराध्यक्ष विजयराव वाजे यांनी व्यक्त केले.
प्रभाग क्रमांक चारमधील जुबेर गॅरेज ते देवकर घर तसेच प्रभाग क्रमांक दहामधील गिरमकर घर ते किरण जाधव या रस्ता कामाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. प्रभाग क्रमांक चारमधील रस्त्यांसाठी 7 लाख 92 हजार मंजूर केले. दिलेल्या मंजूरीनूसार सदर रस्त्याचे कामाचे भूमीपूजन प्रभागातील ज्येष्ठ नागरिक केशवराव गवळीसर, आप्पासाहेब मोरे, शिवसेनेचे नेते कैलास जाधव, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, गटनेते रविंद्र पाठक, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, शहरध्यक्ष दत्ता काले, विवेक सोनवणे, डॉ. कुणाल घायताडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तर प्रभाग क्रमांक 10 साठी 10 लाख 70 हजार रस्त्यासाठी मंजूर झाले असून या रस्त्याचे कामाचे भूमीपूजन प्रजापिता ब्रहमाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय राजयोग अध्यात्मीक मेडीटेशन ध्यान केंद्राचे प्रमुख सरलादिदी, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, नगरसेविका हर्षाला कांबळे, बांधकाम सभापती आरिफ कुरेशी, स्वच्छता दुत सुशांत घोडके, ऍड. अशोक टुपके, लायन्स क्बलचे अध्यक्ष रोहीत वाघ, डॉ. नाईकवाडे, डॉ. बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक जनार्दन कदम, दिपक जपे, ाळासाहे आढाव, रामकृष्ण भडांगे, अशोक लोंढे, रामनाथ वैद्य, बंडु पेटकर, निवृत्ती वाघ, संदीप पाटील, दिपक पाटील, भरत देवकरसर, बी.के. तुरकण, भरत देवकरसर, साहेबराव जाधव, रमेश वराडे, सुनील काळे, सुनील नागरे, महेश थोरे, धनवटे, सोमोसे, नामदेवराव बिडवे आदी उपस्थित होते.