पुणे – पोलीस मित्र संघटना छावा संघटनेच्या वतीने मुंबई पोलिसांना 4 हजार एन-95 मास्कचे वाटप करण्यात आले. मुंब्रा येथे झालेल्या एका कार्यक्रमात खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी हे वाटप केले.
यावेळी पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, पोलीस उपायुक्त मंजुनाथ शिंगे तसेच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे पदाधिकारी धनंजय जाधव, सुमीत दरंदले, वैभव ठक्कर यांनी केले होते.
यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, करोनाच्या काळात पोलिसांनी अतिशय मोलाचे काम केले असून अनेकांनी प्राणांचे बलिदानही दिले आहे. पोलीस मित्रांनीदेखील करोनाकाळात महत्त्वाची कामगिरी बजावली.