2007 साली अभिनयाला सुरुवात करणारी अभिनेत्री रसिका दुग्गल ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवत आहे. सध्या रसिका ओटीटीवरील क्वीन म्हणून ओळखली जाते. मिर्झापूर, मिर्झापूर 2, दिल्ली क्राइम, आउट ऑफ लव अशा प्रसिद्ध वेबसिरीजमधून रसिकाने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
आता रसिका या वेबसिरीजच्या पुढील सीझनमध्ये सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आपल्या अभिनयाद्वारे मनोरंजन करण्यास रसिका पुन्हा सज्ज झाली आहे. रसिकाने दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “पुढील सीझनसाठी काम करण्यास सुरुवात केल्यावर असे वाटते की आपल्या जुन्या मित्राला पुन्हा भेटत आहोत.
मला खूप आनंद होत आहे मी ज्या-ज्या वेबसिरीजमध्ये काम केले आहे त्याचा दुसरा सीझनसुद्धा येतोय आणि प्रेक्षक याची आतुरतेने वाट पाहत आहेत. वेबसिरीजमधील पात्र आणि कथा कशा प्रकारे वळण घेते हे पाहणं मला नेहमी मजेशीर वाटते.’