मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर खासदार उदयनराजे चांगलेच संतापले होते. शिवरायांचा अपमान करणारी विधान करायला कोश्यारींना लाज वाटत नाही का? असा सवाल उदयनराजेंनी पत्रकार परिषदेद्वारे उपस्थित केला होता. त्यानंतर उदयनराजेंनी थेट रायगडावरून राज्यपालांविरोधात आंदोलनाची हाक दिली. यानंतर आता एका काँग्रेस आमदार आणि उदयनराजे यांच्यामधील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीय. राज्यपालांना हटवलं नाही तर बांगड्या घालून फिरलेलच बर अशा शब्दात उदयनराजे संताप व्यक्त करत आहेत.
काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यावेळी राज्यपालांविरोधात आम्ही तुमच्या सोबत असल्याचे उदयनराजेंना सांगत आहेत. आम्ही तुमच्यासोबत आहोत राजे तुम्ही फक्त आदेश द्या असं गोरंट्याल यावेळी म्हणताहेत. तर उदयनराजे राज्यपालांविरोधात आपला संताप व्यक्त करताहेत.
नेमकं काय आहे या ऑडीओ क्लिपमध्ये
नमस्कार आमदार गोरंट्याल बोलतोय,राजे आमचा तुम्हाला पाठीबा आहे असं आमदार यावेळी बोलतात. तर समोरून उदयनराजे म्हणतात, एवढं मोठं व्यक्तिमत्व पुन्हा जन्माला येणार आहे का ? कोणत्याही थर्ड क्लास व्यक्तीला महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार आहे का ? यावर गोरंट्याल म्हणतात,सर आम्ही तुमच्या सोबत आहोत,जो आदेश द्याल तो मान्य असेल. आदेश बिदेश नाही हे सर्वांसाठी आहे तुम्हाला सुद्धा अंतःकरणातून वाटत म्हणून तुम्ही बोललात ना … नाहीतर बांगड्या घालून फिरलेलं बर असं उदयनराजे म्हणतात. त्यावर गोरंट्याल म्हणतात त्यांना हकल्लाच पाहिजे सर आम्ही तुमच्या सोबत आहोत. अशा संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीय.