मुंबई – भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे’, असे अजब विधान केले आहे. भाजपच्या नेत्यांची शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव सुरूच असल्याचं यातून दिसून येत आहेत. सध्या प्रसाद लाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामध्ये त्यांनी हे व्यक्तव्य केल्याचं दिसून येत आहे. मात्र, प्रसाद लाड यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली आहे.
अश्यातच, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट करत प्रसाद लाड यांचा चांगलाच समाचार घेतला असल्याचं पाहायला मिळत आहे. “प्रसाद लाड नाक घासून महाराष्ट्राची माफी मागा!, प्रायश्चित्त करा’ असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. सध्या त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, अनेकांनी या ट्विटवर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
अमोल मिटकरी म्हणतात…
भाजपचे आमदार श्री प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात आज नवीन इतिहास मांडला. “छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेले” .परत एकदा इतिहासाशी छेडछाड झाली आहे. भाजपनी छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का?
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 4, 2022
‘भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात नवीन इतिहास मांडला. “छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला व त्यांचे बालपण रायगडावर गेले” .परत एकदा इतिहासाशी छेडछाड झाली आहे. भाजपनी छत्रपतींचा चुकीचा इतिहास मांडण्याची व अपमानाची सुपारी घेतली आहे का?’ असा सवाल अमोल मिटकरींनी विचारला आहे.
प्रसाद लाडांच्या अभ्यासात भर पडावी याकरिता चौथीच्या इतिहासाचे हे पुस्तक त्यांना माझ्याकडून पाठवीत आहे . pic.twitter.com/F4yyr5Sov4
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) December 4, 2022
तसेच ते पुढे म्हणाले, ‘प्रसाद लाडांच्या अभ्यासात भर पडावी याकरिता चौथीच्या इतिहासाचे हे पुस्तक त्यांना माझ्याकडून पाठवीत आहे’, प्रसाद लाड महाराष्ट्राची माफी मागा! फक्त माफी मागूनही चालणार नाही तर नाक घासून प्रायश्चित्त करा, असं मिटकरी म्हणालेत.