मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. 49 वर्षांची असूनही मलायकाने स्वतःला खूपच फिट ठेवले आहे. मलायका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॅन्स देखील वाढत चालले आहेत. अभिनेत्री नेहमीच आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे बोल्ड आणि मादक फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. फॅन्स देखील या ग्लॅमर्स फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
दरम्यान, नुकतंच अभिनेत्री मलायका अरोरा हिचा नवीन शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’चा ऑफिशल ट्रेलर प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे. मालयकाच्या अधिकृत इंस्टाग्रामवर हा ट्रेलर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या शोचे एपिसोड्स पहायला मिळणार आहेत. या शोच्या पहिल्या प्रोमो मध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि खास मैत्रीण फराह खानशी बोलताना मलायकाला अश्रू अनावर होतात. या शोमध्ये मलायका तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त होताना दिसून येणार आहे.
फराह खानशी बोलताना ती म्हणते, ‘मी माझ्या आयुष्यात जे काही निर्णय घेतले, ते सर्व बरोबर होते’. हे म्हणतानाच मलायकाला अश्रू अनावर होतात. मलायकाचा हा नवीन शो येत्या 5 डिसेंबरपासून सोमवार ते गुरूवार रात्री 8 वाजता डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, या प्रोमोत पुढे मलायका म्हणते “मी मूव्ह ऑन झाले आहे. माझ्या एक्सनेही मूव्ह ऑन केलंय. तुम्ही सगळे कधी मूव्ह ऑन होणार?’ या एपिसोडमध्ये मलायकाची बहीण अमृता अरोरानेही हजेरी लावली होती. सध्या या शोचा प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.