झील महाविद्यालयामध्ये शिक्षक विकास शिबिराचे आयोजन

पुणे – माहिती तंत्रज्ञान व संगणक विभागातर्फे आर प्रोग्रामिंग या विषयावर तीन दिवसीय शिक्षक विकास शिबिराचे आयोजन झील महाविद्याल यामध्ये नुकतेच करण्यात आले.

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगीअधिष्ठाता शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ.सुरेश शिरबहाद्दूरकर, डॉ.योगेश गुरव, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ.सुनील सांगवे, संगणक विभागप्रमुख माथीवानं बालकृष्णन, तांत्रिक प्रशिक्षक प्रशिक्षण व संशोधन विभाग आयसीटी प्रवीण जैन, राज्य प्रमुख महाराष्ट्र आयसीटी उपस्थित होते.

सदर शिबिर हे आयसीटी संस्थेने प्रायोजित केलेले आहे. विविध इंजिनिअरिंग कॉलेजमधून चाळीस शिक्षकांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानानंवर काम चालू असताना त्यांना कौशल्यपूर्ण उमेदवार मिळावे व अशा उमेदवारांना तयार करण्यासाठी शिक्षकांनी कौशल्य आत्मसात करणे या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

संस्थेचे सचिव प्राज येशजीकाटकर, कार्यकारी संचालक प्रा.प्रदीप खांदवे,  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अजित काटे यांनी शिबिर यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शन केले.

शिबिराचा यशस्वी आयोजनासाठी प्रा.उल्का आपरे, प्रा.अमर चडचणकर, प्रा.संकेत सहाणे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा.रोहिणी कोकरे यांनी केले. आभारप्रदर्शन प्रा.स्मिता बाचल यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.