राऊत म्हणतात, ‘अजित पवार आमचे होणारे उपमुख्यमंत्री’

मुंबई – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी एक महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या गळ्यात पडणार असल्याचे सूचित झाले आहे.

अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्‍लीन चिट मिळाली. त्याबाबत पत्रकारांनी राऊत यांना प्रतिक्रिया विचारली. “त्यांना क्‍लीन चिट मिळाल्याचा आनंदच आहे. ते आमचे होणारे उपमुख्यमंत्री आहेत,’ असे त्यावर राऊत यांनी म्हटले.

मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार आणि उपमुख्यमंत्रिपद कुणाला मिळणार, याविषयी मोठी उत्सुकता आहे. आता दि. 24 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तशातच उपमुख्यमंत्री कोण होणार, याचे उत्तर राऊत यांच्या वक्तव्यातून मिळाल्याचे मानले जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.