पिंपरी – लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. हा प्रकार जुलै 2019 ते 29 जुलै 2021 या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथील एका कंपनीत घडला. संदीप कांतीलाल दवे (वय 40, रा. नवीन कुंभार वाडा, पोरबंदर, गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने शनिवारी (दि. 5) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दवे आणि फिर्यादी महिला हे एमआयडीसी भोसरी मधील एका कंपनीत एकत्र काम करत होते. जुलै 2019 ते 29 जुलै 2021 या कालावधीत आरोपीने फिर्यादी महिलेला हाताने मारहाण करून महिलेच्या घरगुती परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्याने कामाच्या ठिकाणी व वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन फिर्यादी महिलेसोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.