नगर – करोनाच्या पार्श्वभूमीवर सभासद हिताचे निर्णय घेण्यासाठी परिवर्तन मंडळाच्या वतीने माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर विरोधी संचालक व सभासदांनी सोसायटी समोर ठिय्या दिला.
रविवारी झालेल्या संचालक मंडळाच्या सहविचार सभेमध्ये सभासद हिताचे निर्णय घेण्याची मागणी शासनाच्या नियमांचे व फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सोसायटीचे विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, वसंतराव खेडकर, एन.आर. शितोळे, बी. आर. जीवडे, शिरीष टेकाडे, प्रसाद साठे, देवीदास पालवे, प्रसाद बारगजे, अर्जुन भुजबळ, एस.सी. नरसाळे, बी.जे. शिंदे आदी उपस्थित होते.
सहविचार सभेच्या विषय क्र.9 व 10 नुसार 2019-20 या आर्थिक वर्षासाठी तरतूद बाबत विचार विनिमय करुन, आर्थिक वर्षातील नफा वाटणी बाबत सभासद हिताच्या दृष्टीने निर्णय घ्यावा. तसेच लाभांश व ठेवीवरील व्याज सभासदांच्या खात्यात त्वरीत जमा करावी.