ऍमस्टरडॅम – डचच्या एका संशोधकाने करोनाच्या चाचणीसाठी आता अतिजलद आणि सोपी पद्धत शोधून काढली आहे. पीटर वॅन वीज या संशोधकाने एका अशा एअरलॉक केबिनचा शोध लावलाय की ज्यामध्ये जाऊन केवळ ओरडायचे किंवा गाणे म्हणायचे. या एयरलॉक केबिनच्या माध्यमातून तुम्हाला करोना झाला आहे का नाही याचे निदान होणार आहे.
करोना व्हायरसची स्वॅब टेस्ट वा नोजल टेस्ट ही काहीजणांना आवडत नाही, त्याचा त्रास होतो. अशा व्यक्तींसाठी ही एअरलॉक केबिनची टेस्ट खूप चांगली असल्याचा दावा याच्या संशोधकाने केला आहे. या एअरलॉक केबिनच्या माध्यमातून करोनाची टेस्ट अतिजलद आणि सोपी होते असेही ते म्हणाले.