ठाणे – मंत्र्याच्या नावाने खोटे फेसबुक अकाऊंट उघडणाऱ्या एकाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात 8 एप्रिल मध्ये पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास करून पोलिसांनी या आरोपीला शोधून काढले आहे.
हा आरोपी 28 वर्षीय असून तो औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज औद्योगिक वसाहतीत कॉन्ट्रॅक्ट सुपरवाझर म्हणून काम करीत आहे. त्याने मंत्र्याच्या नावाने खोटे फेसबुक अकाऊंट सुरू करून त्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या होत्या.
त्या प्रकरणात संबंधीत मंत्र्यांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्या फोनवरून त्याने हे बोगस अकाऊंट सुरू केले होते तो फोनही पोलिसांनी जप्त केला असून त्याच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.