-->

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कोटेश्वर विद्यालयात खो-खो स्पर्धा

रेडा(प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे, आयोजित संस्थाअंतर्गत गटस्तरीय खो खो स्पर्धा श्री कोटेश्वर विद्यालय काटी विद्यालयात पार पडल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन स्कुल कमिटीचे निमंञीत सदस्य सोमेश्वर वाघमोडे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत पाच शाळांचे २९ संघ सहभागी झाले होते. यामध्ये १४ वर्ष, १७ वर्षे, १९ वर्षे वयोगटाखालील मुला-मुलींचे संघ सहभागी झाले होते. १४ वर्षे व १७ वर्षे मुलांच्या व मुलींच्या संघात श्री कोटेश्वर विद्यालय काटी या विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला तर १९ वर्ष वयोगटात श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी या संघाने प्रथम क्रमांक पटकावला

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाचे प्राचार्य आर. एल. डोईफोडे यांनी तर सूत्रसंचालन वायचळ एस सी व कुलकर्णी एम एन यांनी केले. क्रीडाशिक्षक चांदणे एस. जी. यांनी खेळाडूंना शपथ दिली. याप्रसंगी काटी गावच्या सरपंच रमल वाघमोडे यांच्यासह शिक्षक,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.