#ICCU19WorldCup : भारतीय संघ जाहीर; प्रियम गर्गकडे कर्णधारपदाची धूरा

नवी दिल्ली : आगामी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत रंगणा-या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धूरा प्रियम गर्गकडे तर ध्रुव चंद जुरेल वर उप-कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.

विश्वचषक स्पर्धा १७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत रंगणार आहे. गेल्या हंगामात भारतीय संघाने पृथ्वी शाॅच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं, त्यामुळे भारतीय संघ यंदा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय संघाने आतापर्यत २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली चारवेळा विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघ १९ जानेवारीला श्रीलंकेविरूध्द पहिला सामना खेळेल.

एकोणीस वर्षाखालील विश्वचषकासाठी भारतीय संघ :

प्रियम गर्ग (कर्णधार), ध्रुव चंद जोरेल (उप-कर्णधार) यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, दिव्यांश सक्सेना, शाश्वत रावत, दिव्यांश जोशी, शुभांग हेगडे, रवी बिश्नोई, आकाश सिंह, कार्तिक त्यागी, अथर्व अंकोलेकर, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), सुशांत मिश्रा आणि विद्याधर पाटील

Leave A Reply

Your email address will not be published.