पळसदेव-गाव पातळीवरील एकमेकांतील विरोध व मतभेद बाजूला ठेऊन गावाच्या विकासासाठी एकत्रित येऊन कार्य केले पाहिजे, तरच गावाचा विकास होईल असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम माजी सभापती प्रवीण माने यांनी केले. पळसदेव (ता. इंदापूर) येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी पळसदेव गावातील बौद्ध वस्ती मध्ये सामाजिक सभागृह उभा करणे 7 लाख, कैकाडी महाराज मंदिर वॉल कंपाऊंड बांधणे 7 लाख, रामाजी गोमाजी मंदिर बांधणे 10 लाख, आदी विकास कामांचे उद्घाटन माने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास इंदापूर पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, हनुमंत बनसुडे, ग्रामपंचायत सदस्य मेघराज कुचेकर, माजी सरपंच दत्तात्रय शेलार, नानासाहेब नायकवडी, रामदास बनसुडे, बबन बनसुडे, वरकुटेचे सरपंच पप्पूलाल घोडके, संपत काळे, शुभम निंबाळकर, सोपान जाधव, नीलेश रंधवे यांसह ग्रासस्थ उपस्थित होते.