शिरूर -शिरूर येथील वळसंगे हॉस्पिटलच्या वतीने व्हॉट्सऍप, हीेळिींरश्री1ास.लो याद्वारे ऑनलाइन ई-कॉन्फरन्स घेत ओपीडी सुरू करण्यात आली आहे. यामुळे डॉक्टर आणि रुग्ण दोन्हीही सुरक्षित राहत असल्यामुळे दुहेरी फायदा होत आहे, अशी माहिती डॉ. आशिष वळसंगे यांनी दिली. करोना महामारीचा सामना करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अत्यावश्यक आहे.
या आजाराची व्यापकता व गांभीर्य लक्षात घेऊन उपचारासाठी प्रत्यक्ष डॉक्टरांना न भेटता व्हिडिओद्वारे अप्रत्यक्षरीत्या भेटून उपचार व औषधेही ऑनलाइन लिहून दिली जात आहेत. शिरूरमध्ये प्रथमच वळसंगे हॉस्पिटलने ई – कॉन्फरन्सद्वारे ओपीडीद्वारे आपण व्हिडिओमधून डॉक्टरांना भेटू शकता.
गुगल यावरून डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली जाते, अपॉइंटमेंट घेतल्यानंतर वेळ दिला जातो, या वेळेत व्हॉट्सऍप व्हिडिओ कॉलिंगद्वारे डॉक्टर आणि रुग्णाचा संवाद होऊन डॉ. आशिष वळसंगे हे रुग्णावर उपचार करत आहेत.
यातून रुग्णाच्या सर्व अडचणी डॉक्टरांना समजू शकतात, त्यावर योग्य औषध उपचार लिहून दिले जातात. सध्याच्या करोना महामारीत डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक डॉक्टरांना राज्यात या करोना विषाणूची लागण झाली आहे. यामुळे शिरूरच्या डॉक्टरांनी हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
“रुग्णांची काळजी अपले पणाने’ या ब्रीद वाक्यास साजेसे आणि समाज उपयोगी कामाचा हा आणखीन एक प्रामाणिक प्रयत्न आहे. करोना महामारीचा यशस्वी सामना करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अत्यावश्यक आहे.
– डॉ. आशिष वळसंगे, शिरूर.