भेंडी, शेवगा, कैरी स्थिर : टोमॅटो, मिरची महागले
मोशी – कांदा, कोबीसह काकडी व वांग्याच्या दरात या आठवड्यात घसरण झाली. कांद्याची आवक वाढूनही दर घसरल्याने शतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजारात रविवारी (दि. 24) फळभाज्यांची आवक 223 क्विंटलने तर पालेभाज्यांची आवक 300 गडड्यांनी वाढली.
सध्या उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाली असून, उत्तम प्रतीचा मालाची 279 क्विंटल आवक वाढूनही कांद्याच्या दरात क्विंटलमागे 100 रूपयांची घट झाली. तरीदेखील किरकोळ बाजारात कांद्याचा प्रतिकिलोचा दर 20 ते 25 रूपये आहे. तर बटाट्याची आवक 119 क्विंटलने घटूनही दरात 100 रूपयांची वाढ झाली. आल्याची आवक 28 क्विंटलने घटूनही दर 1000 रूपयांनी घसरले. भेंडीची 21 क्विंटल आवक वाढूनही दर मात्र स्थिर राहिले. तर दुधी भोपळ्याची आवक दोन क्विंटलने तर गाजराची आवक 16 क्विंटलने घटली. याशिवाय शेवग्याची आवक दोन क्विंटलने तर कैरीची आवक 31 क्विंटलने घटूनही या सर्व फळभाज्यांचे दर मात्र स्थिर राहिले.
लिंबाची आवक 9 क्विंटलने घटूनही दारत 3500 रूपयांची घट झाली. गवारीची आवक 12 क्विंटलने वाढूनही दरात 1500 रूपयांची घट झाली.टोमॅटोची आवक 43 क्विंटलने वाढूनही दरात 100 रूपयांची वाढ झाली. मटारची आवक सात क्विंटलने घटूनही दर 1500 रूपयांची घट झाली. घेवड्याची आवक सहा क्विंटलने वाढूनही दर 1000 रूपयांनी वधारले.दोडक्याची आवक दोन क्विंटलने वाढूनह दरात 750 रूपयांची वाढ झाली.
मिरचीची आवक चार क्विंटलने वाढूनह द्दिर 1500 रूपयांन वधारले. उन्हाळ भुईमूग शेंगांची आवक तीन क्विंटलने घटूनही दरात 500 रूपयांची घट झाली. फ्लॉवरची आवक सात क्विंटलने घटूनही दर स्थिर राहिले. कोबीची आवक 41 क्विंटलने वाढूनही दर 850 रूपयांनी घसरले.
वांग्याची आवक तीन क्विंटलने वाढूनही दर 250 रूपयांनी घटले. रताळ्याची एक क्विंटल आवक होऊन दर 3000 रूपयांवर स्थिरावला. घोसाळ्याची आवक सात क्वंटलने वाढूनही दरात 1750 रूपयांची घसरण झाली. पालेभाज्यांमध्ये सर्वाधिक 19150 गडड्यांची आवक झाली. किरकोळ बाजारात कोथिंबीरीच्या एका गडडीचा दर 15 ते 20 रूपयांवर पोचला आहे.