टाकवे बुद्रुक (वार्ताहर) –बेलज-टाकवे रस्त्याकरिता आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून 60 लाखांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा रस्ता300 मीटर लांब व 5 मीटर रुंद क्रॉंक्रीटीकरण उर्वरित डाबंरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे मावळ तालुका उपाध्यक्ष मारुती असवले, माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले, सरपंच भुषण असवले, उपसरपंच परशुराम मालपोटे, माजी चेअरमन नारायण मालपोटे, उद्योजक अनिल मालपोटे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष बाबाजी गायकवाड, सदस्य सोमनाथ असवले, ज्योती आंबेकर, राजू शिंदे, माजी उपसरपंच ऋषीनाथ शिंदे,
शालेय समिती अध्यक्ष अनिल असवले, माजी उपसरपंच स्वामी जगताप, योगेश शिंदे, विकास असवले, विष्णू जांभुळकर, बजरंग इंगळे, मुनावर अत्तार, संदीप मोरे, काळुराम असवले उपस्थित होते.