पिंपरी, (प्रतिनिधी) – गांजाची विक्री करणाऱ्या एकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून त्या गांजाचे बाजार मुल्य ७२ हजार ५०० रूपये एवढे आहे.
ही कारवाई सोमवारी (दि. २६) रात्री सातच्या सुमारास चिंचवड येथील केएसबी चौकाजवळ महापालिका आयुक्त बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पदपथावर अंधारात करण्यात आली.
किशोर सुनिल राक्षे (वय २८, रा. विजयनगर, मोरवाडीगाव, मुळ रा. रावळगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार शांतारम हांडे यांनी फिर्याद दिली.