पुणे : सध्या करोना विषाणूमुळे प्रत्येकजण काळजी बाळगत आहे.साधं शिंक आली, खोकला आला तरी त्या व्यक्तीकडे करोना रुग्ण आहे की काय म्हणून लोक लांब जात आहेत. मात्र अशाच एका अनोळखी व्यक्तीला वेळेत रुग्णालयात पोहचवून त्याचा जीव वाचविण्याचे काम विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी आनंद रासकर आणि अझरुद्दीन पठाण यांनी केले.
मागील आठवड्यात ही घटना घडली होती. टिंगरेनगर येथील दीपक वाघमारे यांना पहाटेच्या वेळेस त्रास होऊ लागला होता. व्श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. करोना विषाणूंची लागण झाल्याची लक्षणे असल्याने यातच लॉकडाउमुळे घरातील लोक परगावी अडकले असल्याने रुग्णालयात नेणारे जवळअसे कोणी नव्हते. मदतीसाठी जवळ राहणाऱ्या मित्रास फोन केला. तो आल्यानंतर मदतीसाठी अत्यावशक सेवेसाठी त्यांनी फोन लावले. मात्र फोन लागत नव्हते. इतर वाहन मिळतं की नाही हे पाहण्यासाठी तो इमारतीच्याखाली आला. मात्र वाहन उपलब्ध झाले नाही. मात्र तिथे विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे आनंद रासकर आणि अझरुद्दीन पठाण हे दोन गस्तीवरचे पोलीस दिसले गुप्ता यांनी त्यांना मदत मागितली. त्यांनी अँब्युलन्ससाठी फोन लावला मात्र ती मिळण्यासाठी अर्धा तास लागणार होता.
वाघमारे यांना खूपच त्रास होत असल्याने त्यांना त्वरित इस्पितळात हलविणे गरजेचे होते. त्या पोलिसांनी दुसरा पर्याय निवडला वाघमारे यांना खासगी वाहनाने इस्पितळात न्यायाचे. यासाठी वाघमारे यांची चारचाकी वाहन होते. त्यांच्या मित्राला वाहन चालविता येत नसल्याने आनंद रासकर यांनी वाहन चालवलाय घेतले. करोना विषाणूमुळे फिजिकल डिस्टनसींगचे पालन करीत आनंद रासकर वाहन चालविण्यासाठी तसेच वाघमारे हे पाठीमागे बसले.तर पठाण आणि वाघमारे यांचे मित्र हे दुचाकीवरून निघाले. प्रथम वाघमारे यांना विश्रांतवाडी येथील एका रुग्णालयात नेले मात्र करोना रुग्णावर उपचार करण्याची सोय नसल्याने त्या रुग्णालयाने त्यांना ससून रुग्णालयात नेण्यास सांगितले.त्यांना तसेच तातडीने ससूनला हलविले.
ससून रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात आली. करोना विषाणूने नव्हे तर ब्लडप्रेशर मुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता.मात्र त्या आनंद रासकर आणि अझरुद्दीन पठाण यांनी त्या रुग्णास त्रास होत आहे.त्या इसमाचा जीव वाचला पाहिजे यासाठी यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून त्यांना त्वरित रुग्णालयात हलवून औषधोपचार मिळवून दिल्याने वाघमारे यांचा जीव वाचला गेला. तीन दिवस ब्लड प्रेशरसाठीच्या गोळ्या न घेतल्याने त्यांना त्रास झाल्याचे वाघमारे यांनी सांगितले. मात्र पोलिसानची वेळेत मदत मिळाल्यामुळे मला वेळेत उपचार मिळाल्याने वाघमारे यांनी त्यांचे आभार मानले.पेट्रोलिंग करताना आम्हाला हे दोघे रस्त्यावर दिसलें ऍम्ब्युलन्स न मिळाल्याने त्यांना त्या अवस्थेत आम्हाला सोडून जाणे योग्य वाटले नाही. शेवटी आम्ही त्यांना फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करून वेळेत रुग्णालयात दाखल केले, असे पठाण यांनी सांगितले.त्या कठीण प्रसंगात वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरुण आव्हाड यांनी योग्य ते मार्गदर्शन केल्याने वेळेत उपचार मिळू शकले.