पुणे – अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथकाने (पुर्व विभाग, गुन्हे शाखा) बंद कालावधीचा गैरफायदा घेवुन देशी-विदेशी सिगारेट,गायछाप तंबाखु चढया दराने विक्री करणा-या व्यक्तींवर गुन्हे दाखल करुन कडक कारवाई केली आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, दि.23 मे रोजी चर्तु:श्रृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत भावेश समारामजी चौधरी ( 30 वर्षे, रा.व्हिडोज सोसायटी, फ्लॅट नं 9 बाणेर पाषाण लिकं रोड पाषाण) याने उत्तम सुपर स्टोअर्स काप्स भवन सोसायटी, पाषाण येथे कोव्हिड 19 विषाणु प्रादुर्भावाचे अनुषंगाने महाराष्ट्र व केंद्र शासनाने जिल्हाधिकारी पुणे व पोलीस सह आयुक्त यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन, दुकानामध्ये वेगवेगळया कंपनीच्या देशी विदेशी सिगारेट, प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ, असा एकुण कि रु 79,200/- चा माल विक्रीस ठेवला होता.
त्या ठिकाणी ग्राहकांची खरेदी करण्यास, गर्दी होवुन कोरोना विषाणु चा पादुर्भाव वाढु शकतो हे माहिती असतानाही देशी विदेशी सिगारेट, तंबुाखजन्य पदार्थ, विक्रीकरीता ठेवलेल्या असताना मिळुन आला.
त्याचे विरुध्द भा दं वि कलम 188, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51(ब), महाराष्ट्र कोविड 19 उपाय योजना 2020 चे कलम 11 सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम 2003 व नियम 2004 चे कलम 7(2),20(2) प्रमाणे गु र. नं 869/2020 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या एका कारवाईत हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मुकुल सुनील भंडारी ( 26 वर्षे, रा.रुक्मीणी निवास,आंबडण चर्च मागे, कृष्णानगर, लेन 22 घर नंबर 4 कोंढवा ) याने दुकानामध्ये मध्ये वेगवेगळया कंपनीच्या देशी विदेशी सिगारेट, प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ,गायछाप तंबाखु असा एकुण कि रु 85950/- चा माल विक्रीस ठेवले होते.