नेवासा – आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात होत असलेल्या महापुजेचा बहुमान वाकडी (ता.नेवासा) येथील वारकरी दांपत्य भाऊसाहेब मोहनीनाथ काळे व त्यांची पत्नी मंगल भाऊसाहेब काळे यांना मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते ही मनाची महापूजा झाली. त्यांच्या समवेत नेवासा तालुक्यातील वारकरी दांपत्याला मानाचे स्थान मिळाल्यामुळे नेवासा तालुक्यातील वारकरी संप्रादयातून जल्लोष व्यक्त होत आहे.
पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात गुरुवारी (दि.२९) रोजी आषाढी एकादशी निमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महापूजा करण्याचा बहुमान नेवासा तालुक्यातील वाकडी येथील भाऊसाहेब मोहनीनाथ काळे व त्यांच्या पत्नी मंगल भाऊसाहेब काळे यांना मिळाला. काळे दाम्पत्य हे दांपत्य गेल्या ३५ वर्षांपासून देवगड येथील ह.भ.प.भास्करगिरी महाराज यांच्या पायी दिंडीत सहभागी होत असत
.यंदा अखेर त्यांना मुख्यमंञ्याच्या उपस्थित महापुजेचा मान मिळाला असल्यामुळे या वारकरी दापंत्याला एसटी महामंडळाकडून एक वर्षांचा मोफत पासही देण्यात आला.या प्रसंगी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील,मंत्री दादा भुसे,तानाजी सावंत, गिरीश महाजन,दीपक केसरकर,खासदार डॉ.सुजय विखे पाटील,डॉ.श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते