नवी दिल्ली- करोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्लूएचओने नवा महत्वाचा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे कि, करोनाचा ओमायक्रॉन हा शेवटचा व्हेरियंट नाही, बीए 2 सारखे स्ट्रेन भविष्यात अनेक दिसून येतील.
भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे, ओमायक्रॉन व्हेरिएंट आता देशात कम्युनिटी ट्रान्समिशनच्या टप्प्यावर पोहोचला आहे. याचा अर्थ असा आहे की, कोणतीही व्यक्ती, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात न येता किंवा संक्रमित ठिकाणी भेट न देता, करोना पॉझिटिव्ह होईल.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या एका अभ्यासानुसार, 6 फेब्रुवारीपर्यंत भारतात करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढणार आहे. म्हणजेच, पुढील 2 आठवड्यांपर्यंत 6 फेब्रुवारीपर्यंत करोनाबाधितांची संख्या सर्वाधिक असेल.
दुसरीकडे, बनारस हिंदू विद्यापीठाचे व्हायरोलॉजिस्ट प्रोफेसर सुनीत के. सिंह म्हणतात की, करोनाचे नवीन प्रकार चिंतेचा विषय आहेत. ओमायक्रॉनचा जो नवा व्हेरियंट समोर येत आहे. चाचणीमार्फत त्याची ओळख करणे अवघड आहे. त्यांचे म्हणणे आहे की, करोनाच्या नव्या व्हेरियंटची ओळख जिनोम सिक्वेंसिंगद्वारे केली जाऊ शकते. परंतु, जोपर्यंत जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल येतो.
तोपर्यंत त्या व्यक्तीमुळे इतरांना त्याची बाधा झालेली असते. म्हणजेच, संसर्गाचा वेग अधिक असतो. करोनाचा वाढता प्रादुर्भाव अनेकांसाठी चिंतेचा विषय असू शकत नाही, परंतु व्हायरसमध्ये वारंवार होणाऱ्या उत्परिवर्तनामुळे हा प्रकार किती धोकादायक असू शकतो, याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेला चिंता आहे.