ओडिसा – देशातील अनेक भागांमध्ये उन्हाचा जणू कहर माजला आहे. जवळ-जवळ तापमान 40 डिग्री अंशाच्याही पुढे गेलं आहे. त्यामुळे या उन्हाने लोकांची अक्षरशः तारांबळ उडवली आहे. अश्यातच ओडिसातील एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचं दिसू येत आहे. या महिलेने चक्क कडक उन्हात पोळ्या भाजल्या आहेत. गाडीच्या तापलेल्या पत्र्याचा उपयोग महिलेने पोळी भाजण्याकरता केला आहे.
रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्या उन्हामुळे प्रचंड तापत असतात. गाड्यांचा पात्र तव्यासारखा तापलेला असतो याच तापलेल्या पत्र्याचा उपयोग एका महिलेने पोळी भाजण्यासाठी केला आहे. तिने प्रथमतः पिठाचा उंडा लाटून घेतला आणि पोळी भाजण्यासाठी गाडीच्या बोनटचा वापर केला आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे ती पोळी काही क्षणात भाजू लागली.
त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान, महिलेच्या या युक्तीचा नेटकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेकांनी यावर आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. या आधीही एका महिलेने गाडीच्या बोनट वर ऑम्लेट तयार करून दाखवलं होते. तेव्हा सुद्धा असाच व्हिडिओ व्हायरल झाला होता.