यंदाच्या वर्षी गॅसलायटिंग या शब्दाची “वर्ड ऑफ द ईअर’ म्हणून निवड होणे, हा लोकांच्या बदलत्या मानसिक विचाराचे आकलन करून देणारा आहे. अमेरिकेतील सर्वात जुने शब्दकोश प्रकाशक मेरियम वेबस्टरच्या मते, मावळत्या वर्षात हा शब्द सर्वाधिक सर्च झाला आहे. त्याच्या शोधात 1740 टक्क्यांनी वाढ नोंदली गेली आहे. अशावेळी गॅसलायटिंग शब्दाचा अर्थ आणि तो अर्थ समजून घेण्यासाठी वाढलेली रुची या दोन्ही गोष्टी विचार करण्यास भाग पाडणाऱ्या आहेत.
आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी किंवा एखाद्यावर जाणीवपूर्वक टीका करणे, समोरच्या व्यक्तीतील दोष काढून त्यास मानसिकदृष्ट्या त्रास देण्याच्या प्रवृत्तीला गॅसलायटिंग म्हणतात. अलीकडेच या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी जगभगरात उत्सुकता वाढली. यावरून वास्तव-व्हर्च्युअल जगात वाढत्या स्वार्थी वागणुकीचे, व्यवहाराचे आकलन होते. सोशल मीडियावरून टीका- टिप्पणी, ट्रोलिंग हे गॅसलायटिंगचेच प्रकार आहेत. गॅसलायटिंगपासून बचाव करण्यासाठी सजग राहणे गरजेचे बनले असून वेळोवेळी खंबीर उत्तर देणे हाच त्यावर उपाय आहे.
2022 साठी गॅसलायटिंग या शब्दाची “वर्ड ऑफ द ईअर’ म्हणून निवड होणे, हा लोकांच्या बदलत्या मानसिक विचाराचे आकलन करून देणारा आहे. अमेरिकेतील सर्वात जुने शब्दकोश प्रकाशक मेरियम वेबस्टरच्या मते, मावळत्या वर्षात हा शब्द सर्वाधिक सर्च झाला आहे. त्याच्या शोधात 1740 टक्क्यांनी वाढ नोंदली गेली आहे. अशावेळी गॅसलायटिंग शब्दाचा अर्थ आणि तो अर्थ समजून घेण्यासाठी वाढलेली रुची या दोन्ही गोष्टी विचार करण्यास भाग पाडणाऱ्या आहेत.
लोकांत वाढती रुची
पब्लिशर मेरियम वेबस्टर यांच्या मते, गॅसलायटिंग शब्दाचा वापर गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे. या शब्दाचा शोध हा खूप वर्षांपूर्वी केला असला तरी गेल्या चार वर्षांत त्याचा वापर वेगाने वाढला आहे.
मानसिक शोषणाचे नवे रूप
सामान्य भाषेत सांगायचे झाल्यास कोणत्याही व्यक्तीत स्वार्थी विचारसरणी वाढणे होय. आपल्या फायद्यासाठी दुसऱ्यांच्या डोक्यात गोंधळाचे वातावरण तयार करणे, दिशाभूल करणे हा गॅसलायटिंगचा उद्देश आहे. आपली गरज आणि ध्येयप्राप्तीसाठी कोणत्याही ओळखीच्या आणि अनोळखी व्यक्तीला मानसशास्त्रीय आधारावर गोंधळून टाकणे होय. अशा रितीने एखादा व्यक्ती एवढा गोंधळून जातो की तो आपल्या विचारावर, क्षमतेवर आणि पात्रतेवरच शंका घेऊ लागतो. ही स्थिती मन दुखावणारी आहे. त्याला मानसिक शोषण असेही म्हटले जाते. एकप्रकारे वैचारिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. ही वागणूक चिंतनीय आहे. यानुसार स्वत:ला चांगले सिद्ध करण्याऐवजी दुसऱ्याच्या उणिवा जगासमोर आणण्यासाठी नियोजनबद्ध रीतीने कारस्थानच समजले जाईल.
प्रत्येक ठिकाणी मुकाबला
घर असो किंवा घराबाहेर असो गॅसलायटिंगच्या स्वार्थी व्यवहारातून आपल्याला प्रत्येक ठिकाणी मुकाबला करावा लागतो. मनात, मेंदूच्या आघाडीवर खेळला जाणारा हा खेळ घरात, बाहेर आणि सर्व ठिकाणी पदोपदी दिसून येतो. एखाद्या व्यक्ती बराच काळ मानसशास्त्रीय आधारावर एखाद्याचे मानसिक शोषण करत असेल तर त्याचा आत्मविश्वास एवढा ढळतो की तो मानसिक खच्चीकरण करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहतो. अशा प्रकारचे वर्तन सामान्य जीवनातच नाही तर राजकारण, व्यवसायात देखील पाहावयास मिळते. आजच्या स्पर्धात्मक काळात अशा प्रकारची वृत्ती वाढलेली दिसते.
आभासी जगातही वापर
व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजेच आभासी जगातही या शब्दांचा अनुभव येत आहे. सोशल मीडियावर मित्र झालेले किंवा अनोळखी व्यक्तीकडून होणारे लिखाण, मतप्रदर्शन यामुळे मानसिक धैर्य ढासळू शकते. अलीकडच्या काळात सेलिब्रिटींला ट्रोल करणे किंवा व्हॉट्सऍप ग्रुपमधील एका व्यक्तीला मानसिक त्रास देणे हे गॅसलायटिंगच्या मानसिकतेतून केले जाते. काही जण अकारण एखाद्याच्या विचारांवर टीका करतात किंवा फोटोला टार्गेट करतात. अशावेळी व्हर्च्युअल जगात होणाऱ्या गॅसलायटिंगमुळे अनेक जण नैराश्याच्या गर्तेत जातात आणि तणावाला बळी पडतात. वास्तव आणि आभास यातील भेद न समजून घेता काही जण जाळ्यात अडकतात. अशा मानसिक स्थितीत ओळखीचे आणि अनोळखी लोक देखील भावना दुखावतात. या कारणामुळेच मावळत्या वर्षात या शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी लोकांत रुंची वाढली आहे.
गॅसलायटिंगपासून कसे वाचावे
गॅसलायटिंगसारखी नकारात्मक विचारसरणी बाळगणारी प्रवृत्ती ही वास्तववादी आणि आभासी दुनियेत वाढत चालली आहे. यापासून वाचण्यासाठी सजग राहणे गरजेचे आहे. यासाठी काही गोष्टींचे आकलन करायला हवे.
मानसिकदृष्ट्या खंबीर राहावे
दुसऱ्याचे म्हणणे ऐकून मत तयार करण्याऐवजी जागरूक राहा. विश्वसनीय व्यक्तीकडून सल्ला घ्या. घाईगडबीत कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. भावनावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक पातळीवर विवकेशील राहा.
– सुचित्रा दिवाकर