मुंबई – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज इम्पेरिकल डाटा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
त्यांनी सांगितले की, आपण केलेल्या कायद्यासारखाच समांतर कायदा मध्य प्रदेश राज्यात सुद्धा आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे की रखडलेल्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या दोन आठवड्यांमध्ये जाहीर करा. यासंदर्भात आम्ही वकिलांशी चर्चा करत आहोत आणि योग्य अभ्यास करून राज्य सरकार पुढील पावले टाकेल, असे भुजबळ म्हणाले.