24 तासांत 35 जणांना संसर्ग
राजगुरूनगर, चाकण नगरपरिषद अद्याप करोनाच्या विळख्यात
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यात 24 तासांत तब्बल 35 व्यक्तींचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून तालुक्याची करोना पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 1052 वर झाली आहे. अशी माहिती सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
चाकण नगरपरिषद कार्यक्षेत्रात नव्याने 9 रुग्ण सापडले. रुग्णांचा आकडा आता 208 वर पोहचला आहे. आतापर्यंत 121 व्यक्ती करोनामुक्त झाल्या आहेत. आतापर्यंत 5 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे 82 व्यक्तींवर करोनाचे उपचार सुरु आहेत. आळंदी नगरपरिषद हद्दीत आज नव्याने 4 व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.
आळंदीत आतापर्यंत 97 व्यक्ती बाधित झाल्या असून 45 व्यक्ती करोनामुक्त झाल्या आहेत, 49 पॉझिटिव्ह व्यक्तींवर उपचार सुरु आहेत. राजगुरूनगर नगरपरीषद कार्यक्षेत्रात नव्याने आज 10 रुग्णांची भर पडल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 116 झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 61 व्यक्ती बऱ्या झाल्या असून 54 व्यक्ती उपचार घेत आहेत.
खेड तालुक्यात मागील 24 तासांत चाकण 9, आळंदी 4, राजगुरूनगर 10 अशा तीन नगर परिषदांमिळून 23 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागातील चऱ्होली खुर्द 3, सोळू 1, शेलगाव 1, मेदनकरवाडी 1, केळगाव 1, चिंबळी 1, कडाचीवाडी 1, निघोजे 1, आणि पिंपरी बुद्रुक 1 या 9 गावांतील 12 व्यक्ती करोना पॉझिटिव्ह सापडल्या आहेत.