आता मादाम तुसॉं म्युझियममध्ये रणवीर सिंहचाही पुतळा

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंहचा “गली बॉय’ ऑस्करसाठी पाठवायचे ठरले, तेंव्हाच याच्यासाठी आकाश ठेंगणे झाले होते. आता त्याच्यासाठी आणखी एक खुशखबर आली आहे. लंडनमधील मॅडम तुसॉं म्युझियममध्ये लवकरच रणवीर सिंहचा मेणाचा पुतळा बसविला जाणार आहे. बुधवारी संध्याकाळी “आयफा’ च्या पुरस्कार वितरण समारंभात पुरस्कार घेताना रणवीरने याची घोषणा केली.

या म्युझियममध्ये दीपिका पदुकोणचा मेणाचा पुतळा यापूर्वीच उभारला गेला आहे. आता तिच्या पुतळ्याच्या शेजारीच रणवीरचाही पुतळा उभा केला जाणार आहे. दीपिकाच्या पुतळ्याच्या संदर्भाने रणवीर म्हणाला, की तिच्या पुतळ्याशेजारी माझाही पुतळा असावा, अशी माझ्या सासूची खूप अपेक्षा आहे.

मी खूप मेहनत करावी, म्हणजे माझाही पुतळा उभारला जाईल, अशी त्यांची ईच्छा होती. आता लंडनच्या म्युझियममध्ये माझाही पुतळा उभारला जाणार आहे. आम्ही लंडनला जाणार आहोत. सासूबाई आपण लंडनमध्येच भेटूयात.

माझ्या बायकोचा पुतळा तिथल्या पुतळ्यांमध्ये सर्वात सेक्‍सी आहे. दीपिका एक परफेक्‍शनिस्ट आहे आणि यामुळेच तिचा पुतळा बनवताना प्रत्येक गोष्टीबद्दल विचार करायला लागला, हे आपल्याला मान्य केलेच पाहिजे, असेही रणवीर म्हणाला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)