मुंबई – ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणून आरटीजीएस (रिअल टाईम ग्रॉस सेतलमेंट) सुविधेकडे पाहिले जाते. मात्र, सध्या ही सेवा बॅंकांच्या वेळेतच उपलबध असते. आता लवकरच ही सेवा अव्याहत वापरता येणार आहे.
आरटीजीएसद्वारे त्वरित पैसे पाठवण्यास मदत होते. मोठी रक्कम पाठवण्यासाठी या सुविधेचा प्रामुख्यानं वापर केला जातो. निरनिराळ्या बॅंकांसाठी पैसे पाठवण्याची मर्यादा ही निरनिराळी आहे. यापूर्वी डिसेंबर मध्ये इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफरशी निगडीत नियमांत बदल करण्यात आला होता. गेल्या वर्षापासून ग्राहकांसाठी बाय बाय ही सुविधा उपलब्ध आहे. आरटीजीएसद्वारे पाठवण्यात येणा-या पैशांना किमान मर्यादा नाही. तसंच कमाल मर्यादा ही निरनिराळ्या बॅंकांवर अवलंबून आहे.
बॅंकिंगशी निगडीत एका नियमामध्ये 14 डिसेंबरपासून बदल होणार आहे. या बदलणाऱ्या नियमाचा ग्राहकांना मोठा फायदाही होणार आहे. येत्या 14 तारखेपासून आरटीजीएस सुविधा 24 तास मिळणार आहे. ग्राहकांना आरटीजीएसद्वारे दिवस कोणत्याही वेळी पैसे पाठवता येणार आहेत.
ऑक्टोबर महिन्यात आरटीजीएसची सुविधा 24 तास करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेनं घेतला होता.
ही सुविधा 24 तास सुरू झाल्यानंतर ज्यांच्याकडे 24 बाय 27 बाय 365 लार्ज व्हॅल्यू रिअल टाईम पेमेंट सिस्टम असलेल्या जगातील अवघ्या काही देशांच्या भारत सामील होणार असल्याचं रिझर्व्ह बॅंकेनं म्हटलं होतं. सध्या आरटीजीएसची सुविधा दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवार सोडून कामकाजाच्या इतर दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळात उपलब्ध असते.