मेलबर्न – सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचने शनिवारी बल्गेरियन ग्रिगोर दिमित्रोव्हवर 7-6(7), 6-3, 6-4 असा शानदार विजय मिळवत मोसमातील पहिली ग्रॅंडस्लॅम स्पर्धा असणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. दिमित्रोव्हवरील विजयासह जोकोविचने विक्रमी 10व्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदाच्या दिशेने आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. या सामन्यादरम्यान त्याला दोनदा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीवर उपचार घ्यावे लागले.
INDvsNZ | टीम इंडियाची मालिकेत विजयी झेप; न्यूझीलंडचा 8 विकेट राखून पराभव
ऑस्ट्रेलियन ओपन जिंकूण विक्रमी 22 वे ग्रॅंडस्लॅम जेतेपद जिंकूण स्पेनच्या राफेल नदालशी बरोबरी करण्याची संधी जोकोविचला आहे. शनिवारच्या सामन्यात दुखापतीमुळे जोकोविच जरासा अस्वस्थ वाटत होता. कोर्टवरील त्याच्या हालचालीही अनिश्चित दिसत होत्या, ज्याच्या परिणामतः त्याला सुरुवातीच्या सेटमध्ये काही गुण गमावावे लागले. त्यामुळे त्याला टायब्रेकरमध्ये सर्वोत्तम प्रदर्षन करणे भाग होते. त्याप्रमाणे त्याने पुनरागमन करताना 4-2 अशी आघाडी घेताना, मागे वळून पाहिले नाही.
#INDvsNZ | सिराजनंतर आता शमीही चमकला; न्यूझीलंडच्या अवघ्या १०८ धावांतच १० विकेट
दुसऱ्या सेटमधील जोकोविचच्या हल्ल्यासमोर 27व्या क्रमांकावरील दिमित्रोव्ह वारंवार चुका करताना दिसला. अखेर जोकोविचने दुसरा आणि तिसरा सेट 6-3, 6-4 अशा फरकाने जिंकत सामनाही आपल्या नावे केला. जोकोविचने सामना जिंकला असला तरी दुखावलेल्या हॅमस्ट्रिंगने त्याची डोकेदुखी वाढली आहे, त्यात पुढील फेरीत त्याचा सामना ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स डी मिनौरशी याच्याशी होणार आहे.
सानिया-बोपण्णा जोडीची विजयी सलामी
अंतिम ग्रॅंडस्लॅम स्पर्धा खेळणारी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा व रोहन बोपण्णा या जोडीने मिश्र दुहेरी स्पर्धेत विजयी सुरुवात केली. सानिया-रोहन जोडीने ऑस्ट्रेलियन जोडी जैमी फोरलिस आणि ल्यूक सॅव्हिल यांचा 7-5, 6-3 असा पराभव केला. मिश्र दुहेरीसोबतच सानियाने तिची कझाकची जोडीदार अण्णा डालनिना हिच्यासह महिला दुहेरीचीही दुसरी फेरी गाठली आहे. श्रीराम बालाजी-जीवन नेदुंचेझियान या जोडीनेही पाचव्या मानांकित इव्हान डोडिग आणि ऑस्टिन क्रॅजिसेक जोडीचा 7-6 (6), 2-6, 6-4 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.