नवी दिल्ली – आपचे नेते संजय सिंह यांनी मंगळवारी राज्यसभा सदस्य म्हणून दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यसभा अध्यक्ष जगदिप धनखड यांनी संसद भवनातील त्यांच्या कार्यालयात सिंह यांना सदस्यत्वाची शपथ दिली. (AAP leader Sanjay Singh takes oath as Rajya Sabha member)
ईडीने काही महिन्यांपूर्वी दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी सिंह यांना अटक केली. सध्या त्यांना तिहार तुरूंगात ठेवण्यात आले आहे.
ते दिल्लीतून दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून गेले. त्यांना राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यासाठी पुरेशा सुरक्षव्यवस्थेत संसदेत नेण्याचा आदेश स्थानिक न्यायालयाने दिला होता. त्यानुसार, संबंधित प्रक्रिया राबवण्यात आली. सिंह यांनी शपथ घेतली त्यावेळी त्यांचे आई-वडील, पत्नी, पुत्र आणि कन्या असा संपूर्ण परिवार उपस्थित होता.