मुंबई – नोरा फतेही ही बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे लाखो चाहते आहे. नोरा तिच्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावत असते. अलीकडेच ती अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या ‘थँक गॉड’ या चित्रपटात दिसली. या चित्रपटातील नोराच्या आयटम नंबर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
View this post on Instagram
त्याचवेळी, नोरा फतेही सोशल मीडियावर सक्रिय असते नोराचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. जबरदस्त लूकसोबतच अभिनेत्रीच्या किलर मूव्ह देखील तिच्या चाहत्यांना वेड लावत आहेत. अशात, इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या लूकमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे.
नोरा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. नोराचे लेटेस्ट व्हिडिओही व्हायरल होत आहे. नोरा एक उत्कृष्ट डान्सर आहे, तिचा आयटम नंबर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे. याशिवाय ती अनेक रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणूनही दिसली आहे.