बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही ही एक उत्कृष्ट डान्सर आहे. ती डान्ससाठी खूप मेहनत घेत असते आणि हे तिच्या परफॉर्मेंसवरून दिसून येते. यापूर्वी सोशल मीडियावर तिने डान्सचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यात तिचा गजब डान्स दिसून येतो.
त्यातच नोराने आणखी एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नोरा फतेहीचे नाव घेताच सर्वात आधी तिच्या आयटम नंबर्सची आठवण येते. इंस्टाग्रामवर ती डान्स व्हिडिओ पोस्ट करत असते आणि तिची खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओत नोरा ही समुद्र किनारी बीचवर डान्स करत आहे.
नोरा फतेहीने “सत्यमेव जयते’ चित्रपटात सुष्मिता सेनचे सुप्रसिद्ध “दिलबर’ गाणे रीक्रिएट केले होते. या गाण्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर नोराने अनेक चित्रपटात आयटम सॉंग केलेले आहेत. ती नुकतीच “इंडियाज बेस्ट डान्सर्स’ रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली होती. मलाइका अरोराला करोनाला करोना झाल्याने काही दिवसांसाठी नोराने तिला रिप्लेस केले होते.