नोरा फतेहीचा “छोड़ देंगे’मध्ये जबरदस्त डान्स

बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीने कधी आपल्या डान्सने तर कधी अभिनयातून चाहत्यांची मने जिंकली आहेत. नोरा फतेहीने सोशल मीडियावर शेअर केलेले डान्सचे व्हिडिओ खूपच व्हायरल होत असतात. “ओ साकी साकी…’, “दिलबर…’ यासारख्या अनेक गाण्यांमधील डान्समधून चाहत्यांवर अधिराज्य गाजविणाऱ्या नोराचे आणखी एक नवीन गाणे नुकतेच रिलीज झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)


यात नोरा फतेहीने जबरदस्त डान्स तर केला आहेत, सोबतच या गाण्यात एका बदल्याची कथा दाखविण्यात आली आहे. हे गाणे टी-सिरीजकडून रिलीज करण्यात आले असून “छोड देंगे’ असे गाण्याला शीर्षक देण्यात आले आहे. हा म्युझिक व्हिडिओ रिलीज होताच यूट्यूब तुफान व्हायरल झाला आहे.
या गाण्यात नोरा फतेहीचा लूक खूपच झक्‍कास असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

यात ती बंजारन लूकमध्ये दिसत आहे. या गाण्याचे शूटिंग राजस्थानमध्ये करण्यात आले आहे. “छोड देंगे’ या गाण्याचे बोल योगेश दुबे यांचे असून अरविंद खैरा यांनी म्युझिक व्हिडिओचे दिग्दर्शन केले आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास नोराने 2014मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. यानंतर सत्यमेव जयतेफ, “बटाला हाउस’ आणि “स्ट्रीट डान्सर 3 डी’मधील आयटम सॉंगमध्ये नोरा झळकली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.