नोरा फतेही तिच्या डान्सिंग स्कीलबद्दल खूपच प्रसिद्ध आहे. तिचे डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ अधुनमधून व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. मात्र, त्यातील नोराच्या डान्सपेक्षा त्या डान्सवर तिच्या आईने दिलेली रिऍक्शनच जास्त इंटरेस्टिंग आहे.
हा व्हिडीओ नोराने स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने एक वेब चॅलेंज स्वीकारले आहे आणि ती कॅमेऱ्यसमोर उभे राहून डान्स करायला लागते. त्याचवेळी स्वयंपाकघरात काम करणाऱ्या नोरा फतेहीच्या आईने हा डान्स बघितला. (या व्हिडीओमध्ये आईचा रोल देखील नोरा फतेहीने स्वतःच केला आहे.) त्यांना आपल्या लेकीचा असला डान्स बघून धक्काच बसतो.
नोराच्या एकएका स्टेपवर त्यांचा रागाचा पारा चढत जातो आणि सरतेशेवटी त्या चक्क नोराला चप्पल फेकून मारतात. ही चप्पल चुकवण्यासाठी नोराला आपला डान्स थांबवावा लागतो आणि ती कॅमेऱ्यासमोरून धूम ठोकते, असा हा व्हिडीओ आहे. सरतेशेवटी “लोक करोनाने मरत आहेत आणि तुला वेब चॅलेंज सुचते आहे.’ असे नोराच्या आईने कॅमेऱ्यासमोर उभे राहून सुनावल्याचेही ऐकू येते.