पुणे – पुणे शहर वाहतूक विभागाच्यावतीने शहरातील विविध ठिकाणच्या पार्किंगसंदर्भात यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर नागरिकांच्या सूचना विचारात घेऊन पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याबाबत अंतिम आदेश जारी करण्यात आले आहेत, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले आहे.
येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत बंडगार्डन पाणी पुरवठा विभागाअंतर्गत येणारे वडगावशेरी टॅंकर भरणा केंद्राच्या समोरील मुख्य रस्त्यावर भरणा केंद्राच्या गेटच्या उजव्या बाजूस 100 मीटर व डाव्या बाजूस 100 मीटर अंतरावर तसेच बंडगार्डन वाहतूक विभागाअंतर्गत किराड चौक ते अलंकार चौक, अलंकार चौक ते आय.बी. चौक आणि साधु वासवाणी चौक ते विधानभवन चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूस नो पार्किंग करण्यात येत आहे.
तळजाई परिसर…
तीन हत्ती चौकाकडून संभाजीनगरकडे, तळजाई स्मशानभूमीकडे तसेच शनीमंदीर, पद्मावतीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस मीटरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना “नो पार्किंग’ करण्यात येत आहे.
लोणी काळभोर परिसर…
लोणी काळभोर वाहतूक विभागाअंतर्गत कॅफे मिलन ते महामार्ग अंडरपासपर्यंत तसेच डी.के. वाइन्स ते एम.जी. वेफर्स ऍन्ड बाईट्सपर्यंत सेवा रस्त्यांवर आणि शंभो स्नॅक्स ते एम.आय.टी. महाविद्यालयापर्यंत “नो पार्किंग’ करण्यात येत आहे
पोलिसांच्या वाहनांसाठी
भारती पोलीस स्टेशन इमारतीच्या पायऱ्यापासून पुढे पोलीस स्टेशनच्या उत्तर बाजूकडील भिंतीचे टोकापर्यंत पोलिसांची सरकारी वाहने पार्कसाठी जागा आरक्षित आहे. चैतन्यनगरकडे डावीकडे वळणाऱ्या रस्त्याच्या टोकापर्यंत दोन्ही बाजूंना दुचाकी व चारचाकीसाठी पी-1, पी-2 पार्किंग करण्यात येत आहे.
भारती विद्यापीठ परिसर…
भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत भारती हॉस्पिटल मुख्य गेट ते पोलीस स्टेशन इमारतीच्या उत्तर बाजूकडील पायऱ्यापर्यंत 100फूट सेवा रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजू व भारती हॉस्पिटल मुख्य गेट ते पोलीस स्टेशन इमारतीच्या उत्तर बाजूकडील भिंतीच्या टोकापर्यंत पूर्वेकडील बाजू “नो पार्किंग’ करण्यात येत आहे.