पुणे – पर्वती येथील योगिता महेश गोसावी (शिवरकर) यांची पुणे शहर राष्ट्रवादी काँगेस पार्टी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या पुणे शहर चिटणीसपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. तर प्रसिद्ध ढोलकी वादक लक्ष्मी कुडाळकर लांबे यांची पुणे शहर संघटक या पदावर निवड करण्यात आली.
चित्रपट कला सांस्कृतिक विभागाचे पुणे शहर अध्यक्ष गिरिश परदेशी यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पर्वती विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विलास मडके उपस्थित होते. या निवडीबद्दल त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.