कणकवली – शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब कणकवली पोलिसांना शरण आले आहेत. राकेश परब हे सोमवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले.
परब यांनी पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांची भेट घेतली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्याकडून परब यांची चौकशी सुरू आहे. चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी परब यांना अटक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, राकेश परब यांच्या मोबाईल फोनवरुन 36 कॉल केले होते. इतर आरोपींनाही कॉल केले होते. तसेच राकशेच्या मोबाईलवरुन हल्ला ज्याच्यावर करायचा आहे, त्याचा फोटो देखील पाठवण्यात आला होता असा संशय पोलिसांना आहे.