कामशेत – खामशेत येथील सुमन रमेश तुलसियानी कॅम्पसमध्ये घुसून अज्ञान चोरट्यांनी कॉलेजच्या तिजोरीतील एक लाख दोन हजार रुपयांची रोकड लंपास केली.
मंगळवारी (दि. 21) पहाटेच्या सुमारास सुमन रमेश तुलसियानी कॅम्पस इमारतीच्या मागील भिंतीची लोखंडी जाळी उचकटून चोरटे कॅम्पसमध्ये घुसले. कॅम्पसमधील कार्यालय व अकाऊंट विभागाचा दरवाजा उचकटून अकाऊंट विभागातील तिजोरीतील शैक्षणिक फीचे जमा झालेली एक लाख दोन हजारांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे, या संदर्भात कॅम्पसचे व्यवस्थापक निलेश गारगोटे यांनी कामशेत पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक मृग्दीप गायकवाड तपास करीत आहेत.