नीरव मोदीच्या कोठडीला 27 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेतील तब्बल 2 अब्ज डॉलरचा गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंगचा आरोप असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या कोठडीला लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयाने 27 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

नीरव मोदीला दक्षिण-पश्‍चिम लंडनमधील वॅंड्‌सवर्थ कारागृहात ठेवण्यात आले आहे. तेथूनच व्हिडीओलिंकच्या माध्यमातून त्याला जिल्हा न्यायाधीश डेव्हिड रॉबिन्सन यांच्यासमोर सुनावणीसाठी हजर केले गेले होते. नीरव मोदीला भारताच्या स्वाधीन करण्याच्या प्रकरणाची सुनावणी 11 मे रोजी आहे. प्रत्यार्पणाच्या या खटल्याचे कामकाज 11 मे पासून पुढे 5 दिवस चालण्याची अपेक्षा आहे.

खटल्यासाठी सर्व पुरावे एकदा कोर्टात देण्यात आल्यानंतर या प्रकरणातील केस मॅनेजमेंटकडून सुनावणी सुरू होईल. नीरव मोदीने जामिनासाठी नोव्हेंबरमध्ये केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता.

प्रत्यार्पणाच्या खटल्यासाठी भारताची बाजू इंग्लंडमधील क्राऊन प्रोसिक्‍युशन सर्व्हिसकडून मांदली जाणार आहे. आता नीरव मोदी जामिनासाठी अर्ज करू शकत नाही, असे या संस्थेच्यावतीने सांगण्यात आले आहे. स्कॉटलंड यार्डने भारत सरकारने प्रत्यार्पणाच्या वॉरंटवरून आणलेल्या आरोपामुळे 19 मार्च रोजी अटक केल्यापासून मोदी वॅंड्‌सवर्थ येथे तुरुंगातच आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.