मॅनहटन – पीएनबी बॅंकेचा कर्जबुडवा निरव मोदी याचा लहान भाऊ नेहल मोदी याच्यावर 26 लाख अमेरिकन डॉलर्स किमतीचे हिरे फसवणूक करून खरेदी केल्याचा गुन्हा अमेरिकेत नोंदवण्यात आला आहे. त्याने जगातील सर्वात मोठ्या हिरे कंपनीला फसवल्याचे आरोपत्रात नमूद केले आहे. त्याच्यावर फर्स्ट डिग्री अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमेरिकेत एक कोटी डॉलर्स पेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्यास फस्ट डिग्री अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येतो.
जगातील सर्वात मोठी हिरे कंपनी असणाऱ्या एलएलडी कंपनीकडून मार्च 2015 ते ऑगस्ट 2015 नेहल मोदीने 26 लाख अमेरिकन डॉलर्सची खरेदी केली होती. त्यासाठी पुरक अटी मिळवल्या होत्या.
नेहलने एलएलडी कंपनीच्या अध्यक्षांशी या व्यवसायातील काही परिचितांमार्फत ओळख करून घेतली. मार्च 2015 मध्ये कॉस्टको होलसेल कॉर्पोरेशनसाठी आठ लाख रुपयांचे हिरे खरेदी केले. कॉस्टको कंपनीने हे हिरे खरेदी करण्यास मान्यता दिली असल्याचे खोटे सांगून 90 दिवसांची क्रेडीट मिळवले. त्यानंतर हे हिरे मॉडेल कोलॅटेरल लोन्सकडे तारण ठेवले.
एप्रिल आणि मे महिन्यात त्याने एलएलडीकडून आणखी तीन वेळा त्याने कोस्टकोसाठी हिरे खरेदी केले. त्याचे एकत्रित मुल्य सुमारे एक लाख अमेरिकन डॉलर्सच्या घरात होते. त्याने एलएलडी कंपनीला द्यायची रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. आपल्या लबाडीवर पांघरूण घालण्यासाठी त्याने कोस्टको रक्कम देण्यात कमी पडत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने देय रक्कम परत करण्याची हमी दिली.
ऑगस्ट 2015 मध्ये एलएलडॅकडे त्याने कोस्टको कंपनीसाठी आणखी काही हिऱ्यांची मागणी केली. त्यावेळी एलएलडीने त्यांच्या परवानगी शिवाय हे हिरे न विकण्याची अट घातली. त्यावेळ मिोदीच्या नावावर 10 लाख अमेरिकन डॉलर्सची थकित रक्कम असल्याने त्याच्या विक्रीच्या वेळी त्याच्या किंमतीचा काही भाग द्यावा अशीही अट घातली.या हिऱ्यांच्या तारणावर त्याने दोन कर्ज घेतली. त्यानंतर हे हिरे प्रत्यक्ष किंमतीपेक्षा कमी किंमतीला वेगवेगळ्या किरकोळ विक्रेत्यांना विकले.
एलएलडीला ही लबाडी लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने त्याची रक्कम भरण्यास सांगितले. अथवा हिरे परत देण्यास सांगितले. मात्र त्याने हिरे विकले असावेत अथवा तारण ठेवले असावेत, त्यामुळे तो हे करू शकला नाही. त्यामुळे त्याच्यावर अफरातफरीचा गुन्हा नोंदवण्यात आला.
इंटरपोल नोटीस जारी –
नेहल मोदीवर इंटरपोल नोटीस जारी करण्यात आली आहे.त्यात त्याला इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषा येतात असे नमूद केले आहे. हा व्यायसायिक वाद असल्याचे सांगून नेहल दोषी नसल्याचे त्याचे वकील रॉजर बर्नस्टेन यांनी सांगितले . तर न्युयॉर्क पोस्टच्या वेबसाईटवर जारी केलेल्या व्हिडिओमध्ये नेहलला इंटरपोल नोटीसबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्याने या प्रकरणाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही असे सांगितले.