नवी दिल्ली – देशातील कोविड-19 च्या सक्रिय रुग्णसंख्या आज 3.05 लाखांपर्यंत खाली आली आहे. देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या केवळ 3.04 टक्के इतकी आहे. गेल्या 24 तासांत 29,690 नवीन रुग्ण बरे झाल्यामुळे एकण सक्रिय रुग्णसंख्येत 3,407 ची घट झाली आहे.
दैनंदिन नवीन रुग्णांची संख्या गेल्या 24 तासांत 26,624 इतकी झाली आहे. गेल्या 21 दिवसांपासून सातत्याने दररोज नवीन रुग्णसंख्या 40,000 पेक्षा कमी आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या जवळपास 96 लाख इतकी आहे.
केरळमध्ये एका दिवशी सर्वाधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे, नव्याने बरे झालेली रुग्णसंख्या 4,749 इतकी आहे. महाराष्ट्रात 3,119 लोक बरे झाले आहेत.
केरळमध्ये दैनंदिन नवीन रुग्णसंख्येचा 6,293 इतका उच्चांक आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 3,940 इतकी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 341 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (74) मृत्यू नोंदविण्यात आले.